हैदराबाद - प्रक्षोभक व वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले 'एमआयएम' पक्षाचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांचे थोरले बंधू आणि एमएमआय पक्षाचे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवेसी अखेर सोमवारी हैदराबाद कोर्टात शरण आले. कोर्टात शरण येताच त्यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली.
असादुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात 2005 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने वारंवार हजर राहण्याचे आदेश काढल्यानंतर ओवेसी तिकडे फिरकले नव्हते. आंध्र प्रदेशमधील मोडक जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिका-यांना शिवीगाळ केल्याचा असादुद्दीन यांच्यावर प्रमुख आरोप आहे. दरम्यान, असासुद्दीन यांची पोलिसांनी कांडा येथील तुंरुगात रवानगी केली असून, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ओवेसी यांनी जामीन अर्ज दाखल केला असून, कोर्ट यावर उद्या सुनावणी करणार आहे.