आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात स्वस्त तंत्राने प्राण्यांचे क्लोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करनाल - जगातील सर्र्वात स्वस्त हँड गाइडेड तंत्राने प्राण्यांचे क्लोन जन्मास घालण्यात नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय) च्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. येथील शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम जून 2009 मध्ये या तंत्राने ‘गरीमा’ही पहिली क्लोन कालवड जन्मास घातली होती. जन्मत: सुदृढ असलेली ही कालवड दोन वर्षे दोन महिने जगल्याने हे तंत्र यशस्वी ठरले आहे. कालवडीपाठोपाठ आता काश्मीरमधील प्रसिद्ध पश्मीना बकरीचा क्लोन करण्यातही एनडीआरआयच्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
या पद्धतीने पहिली क्लोन कालवड जन्मल्यानंतर शास्त्रज्ञांनी आणखी दोन प्रयत्न केले होते, तेही यशस्वी ठरले. यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषदेने एनडीआरआयच्या शास्त्रज्ञांना काश्मीरच्या प्रसिद्ध पश्मीना बकरीचा क्लोन तयार करण्यास सांगितले होते. एनडीआरआय व श्रीनगरच्या शेर-ए -काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे सुमारे तीन वर्षांपूर्वी ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संशोधनात प्रचंड हिमवृष्टीसह अनेक अडथळे आले. मात्र या दोन्ही संस्थांमधील शास्त्रज्ञांनी परस्पर देवाण-घेवाणीच्या माध्यमातून गेल्या 9 मार्चला पश्मीना बकरीचा क्लोन तयार करण्यात यश मिळवले आहे. हा क्लोन तयार करण्यात आलेल्या बकरीपासून वर्षाकाठी सुमारे 300 ग्रॅम पश्मीना लोकर मिळते. शास्त्रज्ञांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.