आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचे सिंहासन सोडा...2014च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अण्णांचा देशभर दौरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम अण्णा 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यासाठी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून अण्णा दीड वर्ष देशभर दौरा करतील. शुक्रवारी उपोषण सोडण्यापूर्वी टीम अण्णाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.
दुसरीकडे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी दिनकरलिखित आणि जेपींच्या आंदोलनात प्रसिद्ध झालेल्या ओळी ‘सिंहासन खाली करो कि जनता आती है...’ चा उद्घोष करत आंदोलनाचा हेतू स्पष्ट केला. उपोषण सोडण्यापूर्वी अरविंद केजरीवाल म्हणाले, आमचे आंदोलन आता राजकीय असेल. रस्त्यावरून ते आता संसदेपर्यंत धडकेल. आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय शक्तिप्रदर्शन करण्यासाठी घेतलेला नाही. दोन वर्षांत काँग्रेसने सक्षम लोकपाल विधेयक, राइट टू रिजेक्ट आणि राइट टू रिकॉल जनतेला दिला तर आंदोलन तात्काळ थांबवू.

हा आहे अजेंडा
आठ मापदंड
ना हायकमांड असेल, ना जाहीरनामा
उमेदवारांची निवड स्वत: करणार नाही
देशातील जनताच सर्वकाही ठरविणार
निवडणूक निधी घेणार नाही
पक्षाचे नावही जनताच ठरविणार
लोकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेणार
जनताजे सांगेल, तेच लागू होईल
जमा-खर्च वेबसाइटवर जाहीर करू
सात उद्देश
देश भ्रष्टाचारमुक्त करणे
सत्ता दिल्लीतून गावापर्यंत आणणे
राजसत्तेचा स्वभाव बदलणे
पारदर्शी व्यवस्था बनविणे
सरकारला सेवकाच्या भूमिकेत आणणे
गावांसाठी कायदे बनविण्याचा अधिकार
संसद, विधानसभेकडून काढून घेणे
तो अधिकार ग्रामसभेला देणे

सरकारने केले दुर्लक्ष, उपोषण बिनशर्त सोडले
टीम अण्णाच्या सदस्यांनी शुक्रवारी उपोषण बिनशर्त मागे घेतले. अरविंद केजरीवाल, गोपाल रॉय आणि मनीष सिसोदिया यांनी दहा दिवसांपासून तर अण्णांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. माजी लष्करप्रमुख सिंह यांनी अण्णांना फळांचा रस पाजला.

अण्णांची घोषणा
भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहू, निवडणूक लढवणार नाही.
2014च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशभर दौरा करू.
मी राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, निवडणूकही लढवणार नाही.
राइट टू रिजेक्ट आणि राइट टू रिकॉल मान्यच करावा लागेल.
सिंह म्हणाले...
भ्रष्टाचार गंभीर समस्या आहे. यासाठी जागरूक राहावे लागेल.
देश दिशाहीन होत चालला आहे की काय, असे वातावरण आहे.
सभ्य लोकांची मानहानी करण्याचा प्रयत्न होईल.
देशातील जनतेकडे जादूची कांडी आहे. युवकांनी ठरवले तर देशाचे नशीब ते बदलू शकतात.

आपल्याला काय वाटते

अण्णांना आता कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावे लागेल? टीममधून आता कोणाला बाहेर काढावे लागेल, कोणाला घ्यावे लागेल? राजकारणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार संपवण्याचा मार्ग लांब पल्ल्याचा तर नाही ना? एसएमएस करा 9223177890 वर
अण्णांना भाजपचे आमंत्रण अन् घूमजाव
उपोषण सुटले, आता टीम अण्णा लढवणार निवडणूक
भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात
टीम अण्णा उद्या सायंकाळी उपोषण सोडणार; राजकीय पर्यायाचा विचार सुरु
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!
अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये रॅली
अण्णा आले, गर्दी वाढली: जंतरमंतरवर उपोषण सुरू