आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - जंतर-मंतरवर गेल्या नऊ दिवसापासून सुरु असलेले टीम अण्णाचे आंदोलन अखेर शुक्रवारी सायंकाळी सुटणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द अण्णा हजारे यांनी आज दुपारी जंतरमंतरवर केली. यावेळी ते म्हणाले, आंदोलन करुन प्रश्न सुटणार नसल्याचे अनेक तज्ञांनी व नागरिकांनी आम्हाला सांगितले आहे. तसेच रस्त्यावरची लढाई संसदेत गेल्याशिवाय आमच्या लढ्याला मजबूती येणार नाही. त्यामुळे लोकांनी आम्हाला राजकीय पर्याय सुचविला आहे. मात्र आम्ही पक्ष काढणार नाही. परंतू, आम्ही राजकीय पर्याय तयार करीत असल्याचे सूतोवात अण्णांनी दिले. तसेच एखादा राजकीय काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.
माझ्यासह माझे सर्व सहकारी शुक्रवारी सायंकाळी उपोषण सोडत असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.
त्याआधी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले अरविंद केजरीवाल म्हणाले, 'अनेक मान्यवरांनी उपोषण सोडण्याचा आग्रह केला आहे. हे आंदोलन आता केवळ उपोषण करुन चालणार नाही. तर त्याला आता पर्याय दिला पाहिजे, असे जनतेतून मत व्यक्त होत आहे.'
अण्णांनी एक पर्याय ठेवला आहे की, टीम अण्णा चारित्र्यवान आणि देशाबद्दल प्रेम असलेल्या व्यक्तीला पाठिंबा देईल. उमेदवाराची निवड कशी करायची याबद्दल जनतेने पुढच्या दोन दिवसात सुचना द्याव्यात. असे आवाहन टीम अण्णाने केले आहे. केजरीवाल म्हणाले, सत्तेच्या खुर्चीतच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून सत्तेत आलेली व्यक्तीच भ्रष्ट झाली तर काय करायचे हाही आमच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय करायचे याबद्दलही जनतेने त्यांचे विचार व्यक्त करावेत. हे आंदोलन सत्ता परिवर्तनासाठी नाही तर, व्यवस्था बदलली पाहिजे यासाठी सुरु आहे. तर हे आपण कसे करणार आहोत, याबद्दलही जनतेने सांगितले पाहिजे. मतदार पैसे, दारू आणि विविध प्रलोभनांनी विकले जातात ही वस्तूस्थिती आहे. तेव्हा आपला मतदार हा या प्रलोभनांना बळी पडणार नाही यासाठी आपण काय करु शकतो याचाही पर्याय शोधण्याची गरज केजरीवाल यांनी व्यक्त केली. यासंबंधीतही जनतेला पर्याय सुचविण्याचे त्यांनी आवाहन केले. आंदोलनातून उभे राहिलेले राजकीय पक्षही सत्ता हातात आल्यानंतर ध्येयवाद विसरतात असे सांगत केजरीवाल यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचे कौतूक करतानाच त्यांच्यापासून मुलायमसिंग आणि लालू प्रसाद यादव यांच्यासारखे नेते तयार झाल्याची त्यांनी उपस्थितांना आठवण करुन दिली.
टीम अण्णाने राजकारणात उतरावे का? टीमने मागितली जनतेतून मते...
टीम अण्णाची फसलेली ब्लॅक कॉमेडी (अग्रलेख)
सरकारचे टीम अण्णाकडे दुर्लक्ष, अण्णाही आक्रमक
टीम अण्णाचा आरोप, ९ राज्यात 'ब्लॅक आऊट' सरकारचे कारस्थान
टीम अण्णाचे उपोषण संपवू इच्छितात श्री श्री रविशंकर
अण्णा राजकारणात! जनतेतून उमेदवार निवडणार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.