आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लोकपाल विधेयकासाठी सरकारविरोधात लढणारी टीम अण्णा बरखास्त करण्यात आली आहे. स्वतः अण्णा हजारे यांनी त्यांच्या ब्लॉगवर हे जाहीर केले आहे. टीम अण्णाची कोअर समिती बरखास्त करण्यात आली आहे. टीम अण्णाचे कार्य संपले आहे, असे अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहीले आहे.
अण्णा हजारे यांनी ब्लॉगवरुन स्पष्ट केले आहे की, टीम अण्णाची स्थापना केवळ जनलोकपाल विधेयकासाठीच करण्यात आली होती. टीम अण्णा बरखास्त केली असली तरीही जनलोकपाल विधेयकासाठीचे कार्य संपलेले नाही. यानंतर सरकारसोबत कोणताही सबंध ठेवण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढील लढा राजकीय असेल. टीम अण्णा या नावाने सुरु असलेले सर्व कार्य आज समाप्त झाले आहे.
अण्णा ब्लॉगमध्ये म्हणतात, सरकारला जनलोकपाल विधेयक मंजूर करायचे नाही. अशा वेळी किती वेळा उपोषण करणार. आता उपोषण सोडा आणि जनतेसमोर एक पर्याय द्या. जनतेकडूनच ही मागणी होत होती. त्यामुळे मीदेखील विचार केला. अशी सरकार भ्रष्टाचार दूर करणार नाही. त्यामुळे चांगल्या लोकांना शोधून त्यांना संसदेत पाठवावे, हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. यासाठी एका पार्टीची स्थापना करण्यात येईल. परंतु, मी कोणत्याही पार्टीचा सदस्य राहणार नाही तसेच निवडणूक लढविणार नाही, असे अण्णांनी स्पष्ट केले.
आता येणार तयारी कमिटी
अण्णा हजारेंनी कोर कमिटी बरखास्त केली. यानंतर आता अण्णांनी राजकीय प्रवास सुरु होणार असल्याचे सांगितले. जनलोकपालसाठीच ही समिती स्थापन करण्यात आली होती. आता पुढील रचनेसंदर्भात चर्चा सुरु आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन सांगितले. नव्या समितीचे नाव 'तयारी कमिटी' असे ठेवण्यात येणार आहे.
टीम अण्णा बरखास्त करण्याच्या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, हे तर होणारच होते.
देशाला राजकीय पर्याय देणे सोपे नाही : अण्णा हजारे
अण्णा हजारेंसाठी दिल्लीचा राजकीय प्रवास खडतरच
भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.