आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदेवांना सोडा, कलामांना सोबत घ्या; अण्णांच्या राजकीय प्रवासावर वाचकांनी मांडली मते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली, जयपूर, रांची, अहमदाबाद, औरंगाबाद - अण्णांनी राजकारणात येण्याचे रणशिंग फुंकले. याच मार्गाने भ्रष्टाचार संपवण्याचा त्यांचा इरादा आहे; परंतु हे सोपे आहे काय? भास्कर नेटवर्कने वाचकांची मते आजमावली. तीन प्रश्नांच्या उत्तरात 13 राज्यांतून 12000 वर एसएमएस आले.
दैनिक भास्कर डॉट कॉम आणि दिव्य मराठी डॉट कॉमवरही देश-विदेशातील वाचकांनी मते मांडली. बहुतांश लोक अण्णांच्या निर्णयाशी सहमत आहेत. बाडमेरचे गोविंद जाट, सीकरचे दिनेश डाडियासह अनेकांनुसार अण्णांना निवड, ऐकणे आणि बोलण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. टीममधील एक चुकीचा चेहराही उद्देश भरकटवू शकतो. आरोपांपेक्षा अण्णांना व्यवस्था सुधारणेवर भर द्यावा लागेल, असे इंदूरच्या मेहुल जैनांचे म्हणणे आहे. राजकारणात येऊनही राजकारणापासून दूर राहावे, असा जळगावच्या आनंद मुंदडा यांचा सल्ला आहे. जयपूरचे विनोद पांडे रामदेवांसारख्यांपासून दूर राहण्याचे सांगतात. केजरीवालांसारख्यांना दूर सारून कलाम, नारायण मूर्ती यांना टीममध्ये घेण्याचा सल्ला ग्वाल्हेरचे राकेश साहू, कोटा येथील डॉ. अफरोज यांनी दिला आहे.
प्रश्न -1 अण्णांनी कोणत्या गोष्टींची सर्वाधिक दक्षता घ्यावी?
- अण्णांनी आपली प्रकृती, नेत्यांकडून होणा-या टीकेबरोबरच आपली टीम भ्रष्ट मार्गाकडे जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
प्रश्न -2 टीममधून कुणाला काढले, कुणाला घेतले पाहिजे?
- केजरीवाल, मेधा पाटकर, रामदेवबाबांना टीमपासून दूर ठेवावे. तसेच संतोष हेगडे, कलाम, नारायण मूर्ती यांना सोबत घ्यावे.
प्रश्न -3 राजकारणामुळे ही लढाई लांबणार तर नाही?
- उपोषण करून मरण्यापेक्षा जिवंत राहून लढाई लढायला हवी. जे राजकारण भ्रष्ट आहे, त्यातच यावर उपाय दडलेला आहे.
सल्ला - बेरोजगारांना कार्यकर्ते करा
राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि झारखंड राज्यातील 6 हजारांहून अधिक वाचकांना वाटते की, अण्णांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुण, गरीब, मजूर आणि लष्करातून निवृत्त प्रामाणिक अधिका-यांना सहभागी करून घ्यावे.
अपेक्षा - साथीदारांची हमी घ्यावी
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या 4260 वाचकांना वाटते की अण्णांनी साथीदारांना निवडणुकीत उतरवण्याऐवजी त्यांनी स्वत: मैदानात उतरावे. कारण देश टीमपेक्षा अण्णांवर विश्वास ठेवू शकतो. आपल्या साथीदारांची हमी अण्णांना घ्यावी लागेल.
आशा - भाजपसारखे शब्द फिरवू नका
मध्य प्रदेश, गुजरात, चंदिगडमधील 3380 वाचकांना वाटते की, अण्णांच्या पक्षाने सत्तेत आल्यानंतर भाजपसारखा शब्द आणि विचार बदलू नयेत. केवळ एका पक्षाविरुद्ध राजकारण करू नये. यामुळे अण्णांची प्रतिमा रामदेवबाबा यांच्यासारखी होईल. इतर मुद्द्यांवर बोलू नये.
पक्षाचे नाव असावे : शुद्ध जनता पार्टी, स्वराज पार्टी, अण्णा पार्टी
तिकिटासाठी अट : संपत्ती दान करा, तरच मिळेल पक्षाचे तिकीट
आरोपांवर कारवाई : आरोप होईल त्यांना टीममधून काढा
अण्णा हजारेंसाठी दिल्लीचा राजकीय प्रवास खडतरच
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पवारांकडून अण्णांची खिल्ली
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!