आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारे पाटण्यातही हिट; आंदोलनाच्या हाकेला तरुणाईची पुन्हा साद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशाला दुस-या स्वतंत्रलढयाची गरज असल्याचे सांगत आज जनतंत्र मोर्चाची घोषणा केली. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णा हजारे यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानातून आणखी एका लढ्याची घोषणा केली.

अण्णा म्हणाले, आज घोषित करीत असलेला जनतंत्र मोर्चा कधीही निवडणूक लढविणार नाही. हा मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील भारत बनविण्याचा प्रयत्न करेल. यावेळी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग, किरण बेदी यांच्यासह टीम अण्णांतील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या गुरुवारी होणा-या कॅबिनेटमध्ये लोकपाल बिलावर चर्चा होणार आहे.