आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोपालगंज- काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या जुली-मटूकनाथ प्रेमप्रकरणाप्रमाणेच आणखी एक प्रेमी युगुल चर्चेत आले आहे. गोपालगंज येथील महेंद्र दास महाविद्यालयाचे प्राचार्य संत रामदुलार दास यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी विवाह केला. स्वतःला संत म्हणविणा-या दास यांनी असा कारनामा केल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर संघटना संतप्त झाल्या आहेत.
दास यांनी लग्न केल्यापासून त्यांचा कडाडून निषेध होत आहे. काही संघटनांनी दास यांच्या पुतळ्याचे दहन करुन त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गरज भासल्यास उपोषणाचा इशाराही संघटनांनी दिला आहे. महाविद्यालयातील निभा नावाच्या विद्यार्थिनीशी दास यांनी जवळीक साधून विवाह केला. तिला त्यांनी गैरमार्गाने मदत करुन पदव्या मिळवून दिल्या, असा आरोप संघटनांनी केला आहे. दास आणि निभा यांनी 16 जानेवारीला विवाह केला. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. हे जोडपे 21 जानेवारीला महाविद्यालयात परतल्यानंर विवाहाबाबत माहिती मिळाली. दास यांचे वय 65 वर्षे आहे. हे वय विवाहयोग्य नसल्याचे ते मानतात. परंतु, लग्नानंतरही मी संतच राहणार असून संत परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर निभा म्हणते की, लग्नापूर्वी ती प्राचार्यांना सदगुरु मानत होती, आताही ती त्यांना गुरुच मानते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.