आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आसाममध्‍ये लष्‍काराच्‍या जवानांनी केली मुलीची छेडछाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबसागर - गुवाहाटी येथील अल्‍पवयीन मुलीच्‍या विनयभंगाचे प्रकरण पटलेले असतानाच आणखी एक छेडछाडीची घटना असाममध्‍ये उघडकीस आली आहे. यावेळी लष्‍कराच्‍या जवानांवर आरोप करण्‍यात आला आहे. सीबसागर जिल्ह्यात जवानांनी मुलीची छेड काढल्‍याची घटना घडली. डोलोपा येथील जंगलात हा प्रकार घडला.
प्राप्‍त माहितीनुसार, लष्कराचे पथक रात्रीच्‍या गस्‍तीवर होते. त्‍याचवेळी स्वयंपाकासाठी लाकडे आणण्‍यासाठी जंगलात आलेली एक मुलगी त्‍यांच्‍या नजरेस पडली. जवानांनी तिचा विनयभंग करण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, तिने आरडाओरड करुन स्‍थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. नागरिकांनी या जवानांना बदडून काढले. हे सर्व जवान नीताईपुखुरी येथे तैनात आहेत.
गुवाहाटीतील पिडीत मुलीला दिले होते सिगारेटचे चटके
टवाळखोरीमुळे उस्मानाबादेतील मुली असुरक्षित!
विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्‍काराने हरियाणा हादरले