आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Antony Ask Pannetta To Transfer Technology To India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरेदी खूप झाली, तंत्रज्ञान द्या: अँटनी यांची पनेटा यांच्याकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संरक्षण करारामध्ये तंत्रज्ञान, खासकरून दुहेरी वाप-याचे तंत्रज्ञान सोपविण्याची मागणी संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांनी अमेरिकी संरक्षण मंत्री लियोन पेनेटा यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान केली. पनेटा यांनी दौ-याच्या अखेरच्या दिवशी अ‍ॅँटनीसोबत आशिया प्रशांत क्षेत्रातील युद्धविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. पनेटा नऊ दिवसांच्या आशिया दौ-यावर आहेत.
शस्त्र खरेदी विक्रीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची इच्छा भारताची आहे. भारत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर भर देऊ इच्छितो. संरक्षण मंत्रालय स्वदेशी शस्त्र निर्मिती करण्यास उत्सुक आहे. अमेरिकेने भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटन, डीआरडीओला दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानापासून वंचित ठेवले आहे, असे ए. के. अ‍ॅँटनी यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री ए.के.अ‍ॅँटनी यांनी सागरी सीमेवरील बंधनाबाबत ‘नेव्हिगेशन’चा मुद्दा उपस्थित केला. या क्षेत्रामध्ये भारत कोणाच्याही अडथळ्याविना प्रवेश करू इच्छित असल्याचे अ‍ॅँटनी म्हणाले. दक्षिण चीनमध्ये भारताच्या अस्तित्वाबाबत चीनने आक्षेप नोंदवला आहे. अ‍ॅँटनी यांचा हा इशारा चीनसाठी असल्याचे मानले जाते.

आंतरराष्‍ट्रीय कायद्याअंतर्गत प्रकरणे मिटवावीत
दोन देशांमधील प्रकरणे आंतरराष्‍ट्रीय कायद्याअंतर्गत मिटवण्याची मागणी अ‍ॅँटनी यांनी पनेटा यांच्याकडे केली. आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये बहुस्तरीय सुरक्षा मजबूत करण्यावर अ‍ॅँटनी यांनी भर दिला. संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सायबर सुरक्षेचा मुद्दा चर्चिला गेला.