आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anuradha Sharma Might Have Ate Poisonous Item Before Hanging Herself

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्‍या की आत्‍महत्‍या? गीतिकाच्‍या आईने केले होते विषारी पदार्थाचे सेवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- हवाईसुंदरी गीतिका शर्माच्‍या आईने केलेल्‍या आत्‍महत्‍येच्‍या प्रकरणात नवे वळण आले आहे. गीतिकाची आई अनुराधा यांनी आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी विषारी पदार्थ खाल्‍ला होता, असा अंदाज शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी व्‍यक्त केला आहे. त्‍यामुळे दिल्‍ली पोलिसांसमोर नवेच आव्‍हान उभे राहिले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, अनुराधा शर्मा यांनी गळफास लावून घेण्‍यापूर्वी विषारी पदार्थ खाल्‍ला होता, असा डॉक्‍टरांचा अंदाज आहे. त्‍यांने नेमका कोणता पदार्थ खाल्‍ला होता, हे सविस्‍तर फॉरेन्सिक तपासणीनंतर कळेल. परंतु, श्‍वास कोंडल्‍यामुळेच मृत्‍यू झाला, असे शवविच्‍छेदन अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. मात्र, विषाच्‍या शक्‍यतेमुळे या प्रकरणात गुंता वाढला आहे. अनुराधा यांनी आत्‍म्‍हत्‍या केली की त्‍यांची हत्‍या करण्‍यात आली, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

गीतिका शर्माच्‍या आत्‍महत्‍येमुळे अनुराधा अतिशय व्‍यथित होत्‍या. अखेर त्‍यांनी गेल्‍या शुक्रवारी निवासस्‍थानी आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍येपूर्वी त्‍यांनी लिहीलेल्‍या पत्रात गीतिकाच्‍या मृत्‍यूमुळेच हे पाऊल उचलत असल्‍याचे सांगून त्‍यात गोपाल कांडाचाही उल्‍लेख केला होता. त्‍यामुळे कांडावर आणखी एक गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.