आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anushka Shankar Says She Was Raped By Close Family Friend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्यावरही अनेक वर्षे रेप झाला - अनुष्‍का शंकरचा खळबळजनक खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रसिद्ध सितारवादक स्‍व. पंडित रवि शंकर यांची कन्‍या अनुष्‍का शंकर हिने खळबळजनक खुलासा केला आहे. लहानपणी अनेक वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण झाल्‍याचे अनुष्‍का शंकर हिने सांगितले आहे. एका वेबसाईटवर दिलेल्‍या व्हीडिओ संदेशात तिने हा खळबळजनक खुलासा केला आहे.

व्‍हॅलेंटाईन दिनानिमित्त अनुष्‍काने एक संदेश दिला आहे. त्‍यात तिने अरब महिलांना घराबाहेर निघून त्‍यांच्‍यावर होत असलेल्‍या अत्‍याचाराविरुद्ध आवाज उठविण्‍याचे आवाहन केले आहे. चेंज.ओआरजी या साईटवर तिने संदेश दिला आहे. त्‍यात तिने स्‍वतःवर झालेल्‍या अत्‍याचाराबाबत सांगितले. ती म्‍हणाली, लहानपणी अनेक वर्षांपर्यंत माझे लैंगिक आणि मानसिक शोषण झाले. हे कृत्‍य अशा व्‍यक्तीने केले ज्‍याच्‍यावर माझ्या आईवडीलांचा प्रचंड विश्‍वास होता. मी बळजबरीने स्‍पर्ष करणे तसेच शिविगाळीचा प्रकार अनेक वर्ष सहन केला आहे. अशा घटना माझ्यासोबत घडल्‍या की त्‍यांचा सामना कसा करावा, हेच मला कळत नव्‍हते. अजुनही मी भीतीच्‍या सावटाखाली जगत आहे. रात्री एखाद्या पुरुषाने वेळ विचारली तर उत्तर देण्‍यास मी घाबरते. परंतु, आता मी दिल्‍ली गँगरेप पीडित तसेच तिच्‍यासारख्‍या इतर महिलांसाठी आता जगत आहे. महिलांनी आता बाहरे पडावे. माझ्यासोबत या, आपण नृत्‍य करु. कोणत्‍याही वेदनांवर नृत्‍य परिणामकारक आहे. वेदना दूर करण्‍याची अद्भूत शक्ती नृत्‍यात आहे.