आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाम यांना मंत्रिपद देणार होते वाजपेयी!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 1998 मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांना मंत्रिपद देऊ इच्छित होते. मात्र पोखरण आण्विक चाचण्यांच्या प्रकल्पामुळे स्वत: कलाम यांनीच हा प्रस्ताव फेटाळला.

‘टर्निंग पॉइंट’ या आत्मचरित्राच्या दुसर्‍या भागात कलाम यांनी हा उल्लेख केला आहे. त्या वेळी कलाम संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष होते. नंतर 2002 मध्ये त्यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. आत्मचरित्रात कलाम म्हणतात, ‘15 मार्च 1998 रोजी वाजपेयी यांचा फोन आला. मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. यावर विचार करण्यासाठी मी वेळ मागितला. त्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता भेटण्याची वेळ ठरली होती. त्या भेटीत मी प्रस्ताव नाकारला.’

सहकार्‍यांनी विरोध केला : पहाटे तीन वाजेपर्यंत वाजपेयी सहकार्‍यांशी चर्चा करत होते. मात्र दोन महत्त्वाच्या प्रकल्पांत कलाम गुंतलेले असताना त्यांना मंत्रिपद दिले तर प्रकल्प मागे पडतील, असा सल्ला सहकार्‍यांनी दिला. यावर वाजपेयींनी कलाम यांचे कौतुक करून प्रकल्प पुढे सुरू ठेवण्यास सांगितले होते, असा उल्लेख कलाम यांनी आत्मचरित्रात केला आहे. 1999 मध्ये कलाम केंद्राचे वैज्ञानिक सल्लागार झाले. हे पद कॅबिनेट दर्जाचेच होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट पाहा छायाचित्रांतून
'त्या' चार खासदारांत होते अटल बिहारी वाजपेयी !
वाजपेयी यांची कारकीर्द आता पडद्यावर