आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्‍ट्रपती एपीजे कलाम यांनाही 'फेसबुक'ची भुरळ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: सोशल नेटवर्कींग साईट 'फेसबुक'ने देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनाही भुरळ घातली आहे. कलाम यांनी 'बिलियन बीट्स' नावाने 'फेसबुक'वर पेज तयार केले आहे. 'फेसबुक'च्या माध्यमातून ते आपले विचार सर्वांपर्यंत पोहचवणार आहेत.
कलाम पूर्वीपासून 'यू ट्यूब'च्या माध्यमातून आपले विचार शेअर करत होते. आता ते 'फेसबुक'वर आपल्या विचारांच्या माध्यमातून सगळ्यांना भेटणार आहे. 2007 मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी एक ई-पेपर सुरू केला होता. कलाम यांचे 'फेसबुक' वरील 'बिलियन बीट्‍स' हे त्याच ई- पेपरचा विस्तारित रूप आहे.
'फेसबुक'वरील 'बिलियन बीट्‍स'वर कलाम दररोज आपले विचार शेअर करणार आहेत. 2020 पर्यंत भारत देश जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारे कलाम 'फेसबुक'च्या माध्यमातून तरुणपीढीला प्रेरणा देणार असल्याचे त्यांचे सल्लागार व्ही. पोनराज यांनी सांगितले आहे.
कलाम यांना मंत्रिपद देणार होते वाजपेयी!
मिसाईल मॅन नव्हे 'भंपक कलाम'; शिवसेनेची कडाडून टीका
योग्‍यवेळी निर्णय घेईन- एपीजे अब्‍दुल कलाम