आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्‍करप्रमुखांना ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ने केले होते घायळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’च्या अनुभूतीतून प्रेमबंधनात अडकलेले नवे लष्करप्रमुख विक्रम सिंह त्यावेळी लग्नासाठी सहा महिने वाट पाहायलाही तयार होत नव्हते. लवकरात लवकर लग्न करण्याची खूणगाठ बांधणा-या सिंह यांनी ‘आॅपरेशन वेडिंग’ हाती घेत उपवर मुलीला पाहिल्यापासून एका महिन्यातच लग्न सोहळा पार पाडला, अशी भावना सिंह यांच्या पत्नी सूरजित कौर यांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. सूरजित कौर यांच्या सिंह यांच्याविषयीच्या भावना त्यांच्याच शब्दात...
सिंह यांना मुलांची खूप आवड आहे. घरात मुलांमध्ये ते मुलाप्रमाणेच मिसळता. दोन मुले रमनदीप आणि कंवरदीप त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे. छोट्या नातीला पाहिल्यानंतर त्यांचा दिवसभराचा तणाव पळून जातो. आमच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा ते कमांड कोर्ससाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मुलाला पाहिले, त्यावेळचे त्यांच्या चेह-यावरचे आनंदाचे भाव त्याआधी आणि नंतरही कधी पाहिले नाहीत.
लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट आणि महिनाभरात लग्न
आमच्या लग्नाची एक मजेशीर कथा आहे. त्याला लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट म्हणणे. त्यावेळी ते बेळगावमध्ये कमांडो इंस्ट्रक्टर होते. एका नातेवाइकाच्या लग्नामध्ये आम्हा दोघांची ओळख झाली. मला पहिल्यांदा पाहिल्यावर ते माझ्या प्रेमात पडले, तशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. सुटीवरून परत जाण्याआधी आमचा आठवडाभरात साखरपुडा झाला. त्यानंतर सहा महिन्याने लग्न करण्याचे ठरले. मात्र, या निर्णयावर ते नाराज होते. लग्न महिनाभरातच करायचे असे त्यांनी मला बेळगावहून फोनवर सांगितले. आपल्या कुटुंबियाला त्यासाठी तयार करावे लागले आणि आमचे लग्न पार पडले. लग्नानंतर मला त्यांनी बेळगावला नेले.
न चुकता पूजा अर्चा
काश्मीरमध्ये कार्यरत असताना राष्ट्रीय रायफल्समध्ये पोस्टिंगदरम्यान एका चकमकीमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तो काळ आमच्यासाठी खूप कठिण होता. परंतु धैर्याच्या जोरावर त्यांनी प्रत्येक संकटावर मात दिली. त्यांनी आतापर्यंत कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली नाही. इश्वरावर त्यांची अपार श्रद्धा आहे. कितीही व्यग्र कार्यक्रम असला तरी ते रोजच्या पूजा अर्चेसाठी वेळ काढतात.
65 च्या युद्धामुळे जीवन बदलले
सिंह आपल्या बालपणाच्या आठवणी सांगतात. त्यांनी मला सांगितले की,1965 मध्ये भारत-पाक युद्ध सुरू होते. त्यावेळच्या ब्लॅकआऊटमध्ये लष्करात सामिल व्हावे, असा विचार मनात घोळत होता. मोठे झाल्यानंतर त्यांना तशी संधीही मिळाली. अन्यथा सिंह डॉक्टर झाले असते. त्यांना गुलाम अली, पंकज उधास आणि जगजीत सिंह यांच्या गझला खूप आवडतात.

विक्रम सिंह दृष्टिक्षेप
जनरल विक्रम सिंह यांची 31 मे 2012 रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती.
जगातील दुस-या मोठ्या लष्कराचे ते 25 वे लष्करप्रमुख आहेत.
31 मार्च 1972 मध्ये ते शीख लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये रूजू झाले.
मित्रांमध्ये ते विक्की नावाने प्रसिद्ध
जनरल विक्रम सिंह यांची पत्नी सूरजित मित्र-मैत्रिणींमध्ये बबल्स नावाने ओळखल्या जातात
लष्करातील आतापर्यंतच्या करिअरमध्ये विक्रम सिंह यांनी 5 विशिष्ट पदके प्राप्त केली आहेत.