आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानने उलट्या बोंबा करु नयेः लष्‍करप्रमुखांचे सडेतोड उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा- लष्‍करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी पाकिस्‍तानच्‍या उलट्या बोंबांना सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्‍तानी सैनिकांच्‍या गोळीबाराला भारतीय सैन्‍याने दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात त्‍यांचा सैनिक मारल्‍या गेला असेल. भारतीय सेना विचारपूर्व प्रत्‍युत्तर देते. त्‍यांनी उगाच कांगावा करु नये, असे बिक्रम सिंग म्‍हणाले.

बिक्रम सिंग यांनी आज शहिद हेमराज याच्‍या गावी जाऊन त्‍याच्‍या कुटुंबियांचे सांत्‍वन केले. त्‍यांनी हेमराजच्‍या घरी सपत्निक भेट दिली. तसेच त्‍याचा अंत्‍यसंस्‍कार झाला त्‍याठिकाणी जाऊन श्रद्धांजलीही अर्पण केली. त्‍यानंतर बिक्रम सिंग म्‍हणाले, हेमराज हा सैन्‍य परिवाराचाच सदस्‍य होता. सेनेला त्‍याच्‍या आहुतीची जाणिव आहे. त्‍याच्‍या कुटुंबियांच्‍या सर्व मागण्‍या मान्‍य होतील. यासाठी राज्‍य सरकारसोबत चर्चा करुन निर्णय घेण्‍यात येईल.

पाकिस्‍तानने भारतावर सीमेवर गोळीबार केल्‍याचा आरोप केला आहे. त्‍यात त्‍यांचा एक सैनिकही ठार झाल्‍याचा दावा पाकिस्‍तानने केला आहे. त्‍यावर उत्तर देताना बिक्रम सिंग म्‍हणाले, पाकिस्‍तानचे म्‍हणणे चुकीचे आहे. पाकिस्‍तानी सेनेकडून गोळीबार होतो, त्‍यावेळेस भारतीय सेना प्रत्‍युत्तर देते. अशा स्थितीत आम्‍ही आमच्‍या सीमेमध्‍येच राहून गोळीबाराचे प्रत्‍युत्तर देतो. क्रॉस फायरींगमध्‍ये त्‍यांचा सैनिक मारल्‍या गेला असेल. परंतु, आपले सैन्‍य कधीही मानवाधिकारांचे उल्‍लंघन करत नाही. शहिद हेमराजची पाकिस्‍तानी सैन्‍याने अतिशय क्रूरपणे हत्‍या केली. भारतीय सेना कधीही असे कृत्‍य करणार नाही. हेमराजचे शिर वापस आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.