आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करप्रमुख जनरल सिंग यांनी सरकारला खेचले सर्वोच्‍च न्‍यायालयात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सैन्‍य प्रमुख जनरल व्‍ही. के. सिंग यांच्‍या वयावरुन सुरु असलेला वाद अखेर न्‍यायालयात गेला आहे. सिंग यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात केंद्र सरकारविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्‍यांनी जन्‍मतारीख 10 मे 1951 असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यानुसार ते पुढील वर्षी सेवानिवृत्त होतील, असे त्‍यांनी याचिकेत म्‍हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाची बैठक बोलाविली आहे.
देशाच्‍या सैन्‍य प्रमुखाने सरकारच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात जाण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्‍हणजे, सैन्‍य दिवसाच्‍यावेळी सैन्‍य प्रमुखांनी केलेल्‍या वक्तव्‍यावरुन हा वाद शमल्‍याचे चित्र निर्माण झाले होते. संरक्षण मंत्री ए. के. एटोनी यांनी त्‍यांना सरकारवर विश्‍वास ठेवण्‍याचे आवाहन केले होते. त्‍यावर उत्तर देताना सिंग यांनी संरक्षण मंत्र्यांच्‍या विश्‍वासावर खरे उतरण्‍याचा प्रयत्‍न करु, असे म्‍हटले होते.
असा आहे वाद
सरकारच्‍या लेखी जनरल सिंग यांच्‍या दोन जन्‍मतारखांची नोंद आहे. या तारखा 10 ते 1950 आणि 10 मे 1951 अशा आहेत. तर सैन्‍य प्रमुखांनी यापैकी 10 मे 1951 ही तारीख ग्राह्य धरण्‍यात यावी, अशी मागणी केली होती. त्‍यांच्‍या मॅट्रीकच्‍या प्रमाणपत्रावर हीच तारीख नमूद आहे. परंतु, सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. लोक सेवा आयोगाने घेतलेल्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा अकादमीच्‍या (एनडीए) प्रवेश परीक्षेच्‍यावेळी 10 मे 1950 ही तारीख नोंदविण्‍यात आलेली आहे. हीच तारीख ग्राह्य धरण्‍यात येईल, असे सरकारने स्‍पष्‍ट केले होते. सरकारच्‍या निर्णयानुसार जनरल सिंग हे यावर्षी 31 मे रोजी सेवानिवृत्त होतील.
लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांची नोकरी की प्रतिष्ठेची लढाई ?
पाक व्याप्त काश्मिरमध्ये चीनी फौजा - सेना दल प्रमुख सिंह
'कोणत्याही आव्हानाला सोमोरे जाण्यास सेना सज्ज'