आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लष्करप्रमुखांचा निर्णय दुर्दैवी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी वयाचा वाद सर्वोच्च न्यायालयात नेल्यानंतर बुधवारी सरकारतर्फे पहिल्यांदा प्रतिक्रिया देण्यात आली. जनरल सिंह यांची कृती दुर्दैवी असल्याचे सांगून यामुळे चुकीच्या परंपरेला सुरुवात झाली असल्याचे संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांनी म्हटले आहे.
पल्लम राजू एनसीसी शिबिराच्या कार्यक्रमासाठी आले तेव्हा त्यांनी पत्रकारांजवळ ही प्रतिक्रिया दिली. राजू म्हणाले की, संवेदनशील प्रकरणांवर मी प्रतिक्रिया देणार नाही, मात्र ही घटना संरक्षण मंत्रालय आणि लष्करासाठी दुर्दैवी आहे. सोमवारी जनरल सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी सरकारने न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करून निकाल देण्याआधी सरकारचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे. जनरल सिंह यांनी 66 पानांच्या याचिकेमध्ये अनेक दस्तऐवज दाखल केले आहेत. आपली जन्मतारीख 10 मे 1950 ऐवजी 10 मे 1951 करण्याची इच्छा सिंह यांची आहे. त्यांनी अपील दाखल केल्यानंतर संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी आणि कायदामंत्री सलमान
खुर्शीद यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती.