आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करप्रमुख वाद पंतप्रधानांचे मौन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या वयाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मौन बाळगणेच पसंत केले. हा मुद्दा संवेदनशील असून त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, वयाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मुद्द्यावर उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
येथील विज्ञान भवनमध्ये एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान आले तेव्हा पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याआधी लष्करप्रमुख विजयकुमार सिंह यांनी गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री डॉ. एम. एम. पल्लम राजू यांची भेट घेऊन चर्चा केली. पल्लम राजू यांनी सिंह यांच्याबाबत काल दिलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतल्याचे मानले जात आहे. लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन चुकीच्या परंपरेला सुरुवात केल्याचे राजू यांनी म्हटले होते. सिंह यांनी संरक्षण मंत्रालय आणि लष्करासाठी चुकीचे उदाहरण घालून दिले आहे, असे ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या कारणांमुळे त्यांना कोर्टात जावे लागले याची माहिती त्यांनी राजू यांच्या भेटीत दिली. या प्रकरणाबाबत गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठकही होऊ शकली नाही. यादरम्यान सरकार विरुद्ध लष्करप्रमुख या वादामध्ये दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
व्ही. के. सिंग यांची जन्मतारीख 10 मे 1950 ऐवजी 10 मे 1951 अशी गृहीत धरण्यात यावी. तसे निर्देश सरकारला देण्यात यावे, अशी जनहित याचिका ग्रेनेडियर असोसिएशनच्या (रोहतक शाखा) वतीने दाखल करण्यात आली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.खुद्द लष्करप्रमुख सिंग यांनीही एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्याची सुनावणी मात्र उद्या होणार नाही. सिंग यांचे वकील पुनित बाली यांनीही याप्रकरणी आपल्याला सूचना मिळाल्या नसल्याचे सांगितले. ग्रेनेडियर असोसिएशनच्या वतीने दाखल झालेली याचिका सरन्यायधीश एस. एच. कपाडिया यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठासमोर होणार आहे.