आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Gets Its First Indigenous Made Rudra Attack Chopper

लष्कराला आता ‘रुद्र’चे बळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येलहंका एअरबेस (बंगळुरू) - अत्याधुनिक बनावटीचे लाइट हेलिकॉप्टर ‘रुद्र’ शुक्रवारी भारतीय लष्करात सामील करून घेण्यात आले. ‘रुद्र’च्या सहभागामुळे लष्कर हेलिकॉप्टर मार्‍यासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या टप्प्यात लष्कराला 60 हेलिकॉप्टर देण्यात येणार आहेत.

एअरो इंडिया 2013 मध्ये हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चे अध्यक्ष आर. के. त्यागी यांनी शुक्रवारी रुद्र हेलिकॉप्टरची प्रतिकृती लष्कराचे उपमुख्य लेफ्टनंट जनरल नरेंद्र सिंह यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी सिंह म्हणाले की रुद्रचा लष्करातील सहभाग हा मैलाचा दगड ठरले. यामुळे लष्कराची ताकद अनेक पटींनी वाढू शकेल. रुद्र हेलिकॉप्टर हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. मैदानी युद्धातही रुद्रची कामगिरी महत्त्वाची ठरेल.

क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम : डीआरडीओमार्फत क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमावर सध्या काम सुरू आहे. कमी उंचीवरून उड्डाण करणारी शत्रूंची विमाने व क्षेपणास्त्रे पाडण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असेल, अशी माहिती सारस्वत यांनी दिली.

रशियन पथकाची कसरत : रशियाचे (रशियन नाइट्स) पाच सदस्यांच्या एरोबिक्स टीमने एअर शोच्या तिसर्‍या दिवशी हवाई कसरती सादर केल्या. सुपरसॉनिक लढाऊ विमान सुखोई -27 सह येथे आलेल्या टीमच्या कसरती पाहून उपस्थित थक्क झाले.

अग्नी-6 च्या पुढील टप्प्याची तयारी सुरू - संरक्षण संशोधन व विकास संघटनेकडून (डीआरडीओ) अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल (आयसीबीएम) अग्नि - 6ची तयारी सुरू केली आहे. त्याचे डिझाइन तयार करण्यात आल्याची माहिती डीआरडीओचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी दिली. अग्नी - 6 एकाच वेळी अनेक शस्त्रे वाहून नेऊ शकते. तसेच एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक ठिकाणी लक्ष्यभेद करता येईल. अग्नी - 6 चा पल्ला 6 ते 10 हजार किलोमीटरपर्यंतचा असेल. सध्या या क्षमतेचे क्षेपणास्त्र केवळ अमेरिका व रशियाकडे आहे. त्यानंतर ते भारताकडेही उपलब्ध होईल.