आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्करी गुप्तचर खात्याच्या हवालदाराचीच हेरगिरी, पाकिस्तानला माहिती पुरवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लष्करी गुप्तचर खात्याच्या कार्यालयातील माहिती चोरून आयएसआयला देणा-या एका हवालदाराच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. लष्कर आणि महसूल खात्याच्या गुप्तचर अधिका-यांनी सापळा रचून या देशद्रोही हवालदाराच्या मुसक्या बांधल्या आहेत. हा हवालदार केरळचा असून त्याचे शिवदासन नाव आहे. त्याच्याविरोधात कोर्टमार्शल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात ही कारवाई करण्यात आली. लष्करी गुप्तचर खात्यातील हवालदार शिवदासनच्या हालचालींचा संशय आल्यानंतर तिरुवअनंतपुरम येथे सापळा रचण्यात आला आणि शिवदासनला पकडण्यात आले. त्याच्याकडून काही गोपनीय कागदपत्रे,पेन ड्राइव्हज व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. महसूल गुप्तचर विभागाला या हवालदाराच्या संशयास्पद व्यवहाराबद्दल खबर लागली होती. लष्करी गुप्तचर खात्याचा एका हवालदाराने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संधान साधले असून तो गोपनीय माहिती पुरवण्याच्या तयारीत असल्याचे कळले होते. त्यांनी तत्काळ ही माहिती लष्कराला दिली. महसूल गुप्तचर खात्याला केवळ अमली पदार्थ, बंदी घातलेल्या वस्तूं्च्या देवाण-घेवाणींबद्दल माहिती गोळा करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती दिल्यानंतर लष्कराने कारवाई केली.
संरक्षण मंत्रालयात हेरगिरी, संरक्षण मंत्रालायाचा सपशेल इन्कार
पाक अभिनेत्रीची इगतपुरीत हेरगिरी ?