आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक बनवतोय बॉम्बवर बॉम्ब, भारतीय लष्कर मात्र दुफळीने ग्रस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान बॉम्बचा कारखाना बनत असताना भारतीय लष्कर मात्र गटबाजीच्या राजकारणात व्यस्त असल्याचे दिसत आहे. नुकतेच्या लष्कराच्या मिलिट्री इंटेलीजन्स (एम.आय.)च्या एका शिपायाला हेरगिरी करताना अटक केली आहे. आता हे प्रकरण लष्कराच्या दोन गटातील कलहाचा परिपाक तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या भारतीय लष्करातील शिवदासन या हवलादाराला अटक करण्यात आली. मुळात हे प्रकरण हेरगिरीचे नाही, तर लष्कराच्या दक्षिण विभागाचा हा जवान, माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील संघर्षाचा बळी ठरला आहे. त्याला एप्रिल महिन्यात केरळमधून अटक करण्यात आली होती. लष्कराती गुप्त माहिती विकतांना त्याला अटक झाल्याचे कथितरित्या सांगण्यात आले. मात्र, लष्करातील सुत्रांच्या माहितीनुसार वास्तव काही वेगळेच आहे. शिवदासनने त्याच्या जबाबात एमआयच्या एका कर्नलचे नाव घेतले आहे. तो म्हणाला, या कर्नलने मला गुप्त माहिती देण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दिले होते.
शिवदासन जनरल सिंह यांनी तयार केलेल्या टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन (टीएसडी) मध्ये लिपिक पदावर काम करत होता. त्याच्याकडे गुप्त माहितीचे भंडार होते. या डीव्हिजनचे प्रमुख जनरल सिंह याचे विश्वासू समजले जाणारे कर्नल हनी बक्श होते.
दैनिकातील वृत्तानुसार जनरल सिंह यांच्या विरोधकांचा आरोप आहे की, टीएसडीची निर्मीतीच लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे फोन अवैधरित्या टेप करणे यासाठी केली गेली. टीएसडीच्या तक्रारीही संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या इतर विभागाकडे करण्यात आली होती.
सुत्रांच्या माहितीनुसार, शिवदासनने दावा केला आहे की, त्याला विश्वास देण्यात आले होते की या गुप्त माहितीचा उपयोग लष्कराची अंतर्गत प्रकरणे आणि कर्नल बक्शी यांच्या विरोधात करण्यात येईल. मात्र जेव्हा माध्यमामध्ये शिवदासनच्या अटकेच्या बातम्या येऊ लागल्या, तो आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप होऊ लागला, तेव्हा त्याने या सर्व घटनेची सविस्तर माहिती देण्यास सुरुवात केली.
लष्करी गुप्तचर खात्याच्या हवालदाराचीच हेरगिरी, पाकिस्तानला माहिती पुरवली
लष्कर व सरकारवर चिखल फेकण्याचे काम- लष्करप्रमुख
आव्हानांसाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांचे प्रतिपादन
लष्करात पुन्हा एक घोटाळा, नौका खरेदीत गैरव्‍यवहारः लेफ्ट. कर्नल दत्तांवर ठपका