आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - आठ दिवसांपासून उपोषण करणारे अरविंद केजरीवाल यांची तब्येत ढासळत आहे. त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया आणि गोपाळ रॉय यांची तब्येतही खालावली आहे. या तिघांनाही तत्काळ रुग्मालयात दखल करावे, असे दिल्ली पोलिसांनी टीम अण्णाचे सदस्य नीरज कुमार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. काही बरे वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर राहील असेही या पत्रात म्हटले आहे.
दिल्लीचे सह पोलिस आयुक्त के. सी. द्विवेदी यांनी सांगितले की, हे तिघे 25 जुलैपासून उपोषण करत आहेत. त्यांची तपासणी करणाºया राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्यात असल्याचे म्हटले आहे. रुगणालयाचे अधीक्षक डॉ. टी. एस. सिध्दू यांनी यांसंदर्भात अङवाल पाठवला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आहे. आपण आत्महत्येसाठी नव्ह तर बलिदानासाठी बसलो असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. बळाचा वापर करुन रुगणालयात भरती करण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. यावर द्विवेदी यांनी म्हटले आहे की, या आंदोलनात कायद्याचे पालन करण्यात येणार असल्याची हमी नीरज कुमार यांनी दिली आहे. आता संयोजक म्हणून पोलिसांचे म्हणणे ऐकणे ही नीरज कुमार यांची जबाबदारी आहे.
सरकार आवाहन करणार नाही
काही उपोषणार्थींची तब्येत खालावली असली तरी सरकार कडून आवाहन करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना त्यांचे काम करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, केजरीवाल लोकांना भडकावण्याचे काम करत असल्याचे काँग्रेस प्रवक्त्या रेणुका चौधरी म्हणाल्या.
जम्मूतील पाक शरणार्थींचा पाठिंबा
जम्मू । सहा दशकांपासून जम्मू-काश्मिरात राहणा-या पाक शरणार्थींनी अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. पश्चिम पाकिस्तान शरणार्थी कृती समितीचे प्रतिनिधी जंतर-मंतर येथील उपोषणात सहभागी होणार आहेत. लवकरच एक आठ सदस्यीय प्रतिनिधीचे मंडळ दिल्लीत अण्णांची भेट घेणार असल्याचे समितीच्या नेत्याने सांगितले.
टीम अण्णा संभ्रमात
०सरकारकडून कसलीहा हालचाल न झाल्याने टीम अण्णाची घालमेळ वाढली
०टीम अण्णाच्या कोअर समितीची बुधवारी दोनदा बैठक
०केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि गोपाळ रॉय यांना उपोषण थांबवण्यास सांगण्यात आले.
०या तिघांऐवजी इतरांनी उपोषणास बसण्याचा प्रस्ताव, या तिघांचा मात्र त्यास नकार
माझ्या जिवाला धोका
शासकीय रुग्णालयांत हत्येचा कट रचला जातो असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले. त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण ते आचार्य निगमानंद यांचा या संदर्भात उल्लेख केला. त्यांना रुग्णालयात विष देण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
टीम अण्णाची फसलेली ब्लॅक कॉमेडी (अग्रलेख)
सरकारचे टीम अण्णाकडे दुर्लक्ष, अण्णाही आक्रमक
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!
टीम अण्णाची राष्ट्रपतींवर टीका चुकीचीः रामदेव बाबांची विरुद्ध भूमिका
बाबा रामदेव लढविणार आगामी लोकसभा निवडणूक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.