आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - केंद्र सरकार मला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय दंड विधान संहितेनुसार मी आत्महत्या करण्याचा गुन्हा करतोय. मात्र, मी आत्महत्या नाही तर बलिदान करण्यास सज्ज आहे, असे जनलोकपालसाठी उपोषणाला बसलेले अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
जनलोकपाल विधेयक संमत व्हावे, यासाठी उपोषण करत असलेले अरविंद केजरीवाल आणि गोपाल रॉय यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. केजरीवाल यांची प्रकृती अतिशय खालावली असून, त्यांना आता उठणे-बसणेही शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. टीम अण्णानेही त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. आज दुपारी १२ च्या सुमारास ते प्रथमच मंचावर आले. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले, 'सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर रोज येऊन माझी तपासणी करतात. यापुढे त्यांनाही तपासणीस बंदी घालण्यात येईल. कारण सरकारी डॉक्टरांवरही माझा विश्वास नाही.' हॉस्पिटलमध्ये नेण्यामागे सरकारचे काहीतरी षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. अण्णा हजारे म्हणाले, 'सरकारने जबरदस्ती केली तर सरकारशी कोणतीही चर्चा होणार नाही'
टीम अण्णात मतभेद - गृहमंत्री शिंदे
बुधवारी गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'टीम अण्णाने आडमुठी भूमिका सीकारलेली आहे. टीम अण्णातील प्रत्येक सदस्याचा सूर वेगळा असतो. टीम एक काहीतरी सांगत असते तर अण्णा वेगळेच काही बोलत असतात. त्यांच्यातच मतभेद आहेत.'
PHOTOS : ...तर अण्णा व माझे आंदोलन एक होईल- बाबा रामदेव
अण्णा, राजकारण नको, समाजकारणच बरे!
टीम अण्णाची फसलेली ब्लॅक कॉमेडी (अग्रलेख)
अण्णा आले, गर्दी वाढली: जंतरमंतरवर उपोषण सुरू
अण्णा समर्थकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने
अण्णा राजकारणात! जनतेतून उमेदवार निवडणार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.