आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंची \'लीला\' न्‍यारी, भक्‍ताला दिला \'लाथे\'चा प्रसाद !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदिशा- प्रवचनाबरोबर आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याने आणि कृतीने नेहमी चर्चेत राहणारे आध्‍यात्मिक गुरू आसाराम बापू आता आणखी एका नव्‍या प्रकरणामुळे वादाच्‍या भोव-यात सापडले आहेत. यावेळी आसाराम बापूंनी आपल्‍या रागाचा तडाका चक्‍क आपल्‍या भक्‍तालाच दिला आहे. आसाराम बापूंनी त्‍यांच्‍या वयोवृद्ध भक्‍ताला लाथ मारली. त्‍यामुळे आसाराम बापूंच्‍या विक्षिप्‍त वागण्‍याच्‍या पुन्‍हा एकदा चर्चा झडू लागल्‍या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आसाराम बापू सोमवारी विदिशा येथे सत्‍संगसाठी आले होते. प्रवचनानंतर बापू भक्‍तांबरोबर होते. त्‍याचवेळी त्‍यांचे वयोवृद्ध भक्‍त अमन सिंग दांगी यांनी त्‍यांच्‍या पाया पडण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, बापूंनी दांगींना आशीर्वाद देण्‍याऐवजी त्‍यांना लाथ मारली. बापूंच्‍या अशा पावित्र्यामुळे दांगी आश्‍चर्यचकित झाले. आपण फक्‍त बापूंचे आशीर्वाद घेण्‍यासाठी गेल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.