आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातून वादग्रस्त वक्तव्याचा विरोध ; आशीष नंदींनी मागीतली माफी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये वादग्रस्त वक्तव्य करणा-या आशीष नंदी यांच्या विरोधात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर नंदी यांनी मला कोणाच्याही भावना दुःखवायच्या नव्हत्या असे म्हणत, जर चुकून माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण झाला असेल तर मी क्षमा मागतो, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे, पीयूसीएल या मानवाधिकार संघटननेने नंदी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक आशीष नंदी यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये, सर्वाधिक भ्रष्ट लोक हे दलित, ओबीसी आणि एस.टी समुदायातील असतात असे म्हटले होते. एस.सी. , ओबीसी समुदायाविरोधातील या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात देशभरात प्रतिक्रीया उमटत आहेत.