आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्‍ये पोलिस उपनिरिक्षकाची हत्‍या, गावक-यांवर संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशपाठोपाठ पंजाबमध्‍ये एका पोलिस कर्मचा-याची हत्‍या करण्‍यात आली आहे. तरणतारण येथे रेल रोको आंदोलन करण्‍याच्‍या तयारीत असलेल्‍या शेतकरी नेत्‍यांना अटक करण्‍यासाठी गेलेल्‍या सहायक पोलिस उपनिरिक्षकाची हत्‍या करण्‍यात आली. हत्‍येमागील नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु, गावक-यांनीच त्‍यांची हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय आहे.

कुलवीर सिंग असे या एएसआयचे नाव आहे. जिओबाला गावातील शेतक-यांनी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी या शेतक-यांना रोखण्याचा कुलवीर सिंग गावात केले होते. परंतु, गाक-यांनी उलट त्‍यांनाच ओलीस ठेवले. एवढेच नव्‍हे तर सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कुलवीर सिंग कसे बसे त्‍यांच्‍या तावडीतून सुटले. तर गावक-यांनी त्‍यांचा पाठलाग केला. अखेर त्‍यांना ठार मारण्‍यात आले. त्‍यांचा मृतदेह गावाजवळच्‍या एका कालव्‍यात आढळला. यांचा मृत्यू झाला. शेतक-यांच्या म्हणण्यानुसार कुलवीर सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे. मात्र शेतक-यांनी कुलवीर सिंग यांना मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर जवळपासच्‍या सर्व गावांमध्‍ये तणावाचे वातावरण असून पोलीस कुलवीर सिंग यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करत आहेत.