आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये पुन्हा दंगल; पित्यासह दोन मुलांचे मृतदेह सापडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - दहा दिवसांच्या खंडानंतर आसाममध्ये पुन्हा जातीय दंगल उसळली. यात पाच जण ठार झाले. दंगलीतील मृतांची संख्या आता 61 वर गेली आहे. चिरांग, कोक्राझारमध्ये अद्यापही तणाव आहे.
चिरांग जिल्ह्यातील कावातिका गावातील एक व्यक्ती आपल्या दोन मुलांना घेऊन मदतछावणीतून निघून गेला होता. जाण्यापूर्वी त्याने कुणालाही त्याची कल्पना दिली नव्हती. त्याचप्रमाणे कुठल्या सुरक्षा दलाच्या जवानालाही त्याने सोबत नेले नव्हते.शनिवारपासून हे तिघे बेपत्ता होते.रविवारी दुपारी त्या तिघांचे मृतदेह बोरलांगशू गावात सापडले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. मृतदेह सापडल्यानंतर अल्पसंख्याक समुदायाने रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस महानिरीक्षक एस.एन.सिंह यांनी सांगितले की, अन्य दोघांचे मृतदेह कोक्राझार जिल्ह्यात सापडले असून एक जण बेपत्ता आहे.
धगधगता आसाम