आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेटते आसामः छावण्यांत मुक्कामी दंगल, वेदनाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साल-सागांचे मैलोन मैल दूरपर्यंत पसरलेले घनदाट जंगल. चहामळ्यांचे दरवळणारे डोंगर. चहुबाजूला हिरवळ. उणीव आहे ती फक्त खुशालीची. गावे ओस पडली आहेत. घरे खाक झाली. चार लाखांहून अधिक लोक मदत छावण्यांत आहेत. फाळणीनंतरचे बहुधा सर्वात मोठे विस्थापन. गुवाहाटीपासून 250 कि.मी.वर ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेचा कोक्राझार-धुबरीचा भाग कुरुक्षेत्र बनला आहे. धुबरीहून बांगलादेश सीमा 2 कि.मी., तर कोक्राझारहून भूतान 50 कि.मी.वर.
देशाच्या ईशान्येकडील सात राज्यांना जोडणारी चिंचोळी पट्टी आहे. दिल्ली, कोलकाताहून गुवाहाटीला येणा-या रेल्वेगाड्या कोक्राझारहूनच जातात. असामच्या रिफायनरींचे तेल पाइपलाइनद्वारे येथूनच देशात जाते. गेल्या आठवड्यात बोडो-मुस्लिम दंगलीच्या काळात या सात राज्यांचा तीन दिवस देशाशी संपर्क तुटला होता. सायंकाळी 6 नंतर कोक्राझारमध्ये अघोषित कर्फ्यू असतो.
दंगल 19 जुलैला सुरू झाली. कोक्राझारचे आॅल बोडो मायनॉरिटी स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष मोहिबुल हक यांचे भाऊ रातुल इस्लाम यांच्यावर हल्ला झाल्याचे कारण घडले. तो आसाम पोलिसातील बडतर्फ कॉन्स्टेबल होता. त्याच्या भावाने प्रकरणाला बोडोच्या मुस्लिमांवर हल्ल्याचे रूप दिले. प्रदीप बोडोसह 4 तरुणांचे मुस्लिमबहुल नरबाडीत शिरकाण झाले. त्यांनी प्रदीपला बोडो लिबरेशन टायगर्स या बंडखोर संघटनेचा माजी सदस्य असल्याचे भासवले. दुस-या दिवशी मुस्लिमबहुल भाग, गावांवर हल्ले झाले. त्यांनीही बोडो आदिवासींवर हल्ले केले. तीन दिवसांनंतर लष्कर तैनात झाले. सध्या कोक्राझारजवळ बोडो आदिवासींच्या, तर धुबरीजवळ मुस्लिमांच्या मदत छावण्या आहेत.
उपाशीपोटी जीव मुठीत धरुन तीन दिवस
धगधगता आसाम
आसाम हिंसाचाराचा केंद्रारवरच ठपका