आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • At 15 Muslim Minor Girls Eligible To Marry If Attained Puberty Rules Hc

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंधरा वर्षांच्या मुस्लीम मुलीचे लग्न बेकायदा नाही - हायकोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर एखाद्या मुस्लीम मुलीने वयाची १५ वर्षे ओलांडल्यानंतर म्हणजेच वयात आल्यानंतर लग्न केले तर ते बेकायदा ठरत नाही. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि एस.पी. गर्ग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार ' इस्लामी कायद्यानुसार कोणतीही मुस्लीम मुलगी वयात आल्यानंतर आई-वडिलांच्या सहमतीशिवाय लग्न करू शकते. संबंधित मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तरीही ती तिच्या नव-यासोबत राहू शकते.
मुस्लीम धर्म मानणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लग्नाबाबत आपला निकाल देताना न्यायालयाने अनेक उदाहरणे दिली आहेत. या स्वरूपाच्या खटल्यांमध्ये हे स्पष्ट होते की मुलगी वयात आल्यानंतर तिने लग्न केले तर ते बेकायदा ठरवता येत नाही, असे न्यायालयाने म्हंटले आहे.
एका १६ वर्षाच्या मुलीने पतीसोबत राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मुलीच्या आईने आरोप केला होता की तिच्या मुलीचे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात अपहरण झाले होते.
मुलीने तिच्या जबाबाबत मान्य केले की, तिने स्वतःच्या मर्जीने आवडत्या मुलाशी लग्न करण्यासाठी आई-वडिलांचे घर सोडले आहे. त्यामुळे तिच्या नव-यावर अपहरणाचा लावण्यात आलेला खटला मागे घेण्यात यावा. दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. भारतीय कायद्यानुसार लग्नाच्या वेळी मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ असणे अपेक्षित आहे.
लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणा-या महिला आमदाराला अटक