आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

102 वर्षांच्या आजीबाईचा पेन्शनसाठी यशस्वी लढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा- गुजरातमधील रारोद गावातील इच्छाबा यांनी वयाच्या 102 व्या वर्षी सरकारी पद्धतीने लढा देऊन पुन्हा पेन्शन सुरू करून घेतली आहे. 2001 मध्ये इच्छाबा यांच्या पती रायजीभार्इंचे निधन झाले. त्यानंतर इच्छाबा यांच्या नावावर कौटुंबिक पेन्शन यायला सुरुवात झाली. 2009 मध्ये अधिकाºयांच्या लक्षात आले की, रायजीभार्इंच्या कागदपत्रांमध्ये वारसदारांच्या नावात इच्छाबा यांचे नाव नव्हतेच. त्यामुळे 2009 मध्ये इच्छाबा यांना मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. 2001 पासून मिळालेली पेन्शन परत करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, इच्छाबा यांनी हार मानली नाही. बडोद्यापासून गुजरातची राजधानी गांधीनगरपर्यंत सर्व अधिकाºयांच्या भेटी घेऊन त्यांनी आपले मत मांडले. अखेर आजीबार्इंची पेन्शन सुरू करण्यात आली.