आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atal Bihari Vajpayee Photographs All Government Offices In Madhya Pradesh

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा दिसेल आता प्रत्येक शासकीय कार्यालयात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ: देशाचे मा‍ज‍ी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्‍ठ नेता अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा (छायाचित्र) आता मध्य प्रदेशातील प्रत्येक सरकार कार्यालयात दिसणार आहे. त्यासाठी मध्य प्रदेश सरकार सुमारे 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या दोन महिन्यात हा उपक्रम राबविण्‍याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने घेतला आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्र्यांच्या बंगल्यावरही दिसणार आहेत. मात्र गेल्या आठ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचा हा उपक्रम म्हणजे 'उशीरा सुचलेले शहाणपण!', अशी टीकाही होत आहे.
25 डिसेंबर 2011 ला अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस राज्य सरकारने मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाजपेयी यांचा वाढदिवस हा 'सुशासन दिवस' म्हणून साजरा करण्‍याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
आगामी दोन वर्षांत मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे चिंतेत असलेले सरकारला अटल बिहारी वाजपेयी यांचा आधार घ्यावा लागत आहे. असे बोलले जात आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा लावण्याचे निर्देश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका प्रतिमेसाठी 750 रुपये खर्च येणार आहे. राज्यात विविध शासकीय कार्यालयात सुमारे 3 लाख प्रतिमा लावण्यात येणार आहेत. या उपक्रमावर मध्य प्रदेश सरकार 24 कोटी रुपये खर्च करणार आहे.