आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएम, क्रेडिट कार्ड वापर कमी - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इतर देशांच्या तुलनेत भारतात एटीएम तसेच डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर खूपच कमी प्रमाणात केला जातो. एटीएम कार्डचा वापर आगामी काळात दरवर्षी 25 टक्के या गतीने वाढणे अपेक्षित आहे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्ब्बाराव यांनी आयडीआरबीटी बँकिंग टेक्नॉलॉजीच्या पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना ही माहिती दिली. लोकसंख्येच्या तुलनेत भारतात एटीएमचा वापर कमी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या कमी आहे. तसेच एटीएम तसेच डेबिट व क्रेडिट कार्डाचा वापर यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता तो इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसते. एटीएम कार्ड वापराचा वेगही अतिशय धिमा आहे. 10 लाख लोकसंख्येमागे 63 एटीएम व 497 कार्ड वापर, असे हे प्रमाण आहे. त्यामुळे त्याचा ताण बँक व्यवहारांवर येतो.
एटीएमचा वापर वाढवण्यासाठी बँकेतर इतर क्षेत्रांतील संस्थांनाही त्या केंद्र चालवण्याची जबाबदारी घेणार असतील तर त्यांना एटीएम केंद्र देण्याची आरबीआयची तयारी आहे, असेही सुब्बाराव यांनी स्पष्ट केले.
टाटा बनली सर्वात मोठी एटीएम सेवा पुरवठादार
क्रेडिट रेटिंगचे महत्त्व
एसबीआयची जवानांसाठी क्रेडिट कार्ड योजना