आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांभाळा आपले एटीएम कार्ड, चोरटे लुटतात एटीएममधून पैसे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची (झारखंड) - एटीएम कार्ड चोरून बँक खात्यातून पैसे लुटण्याच्या नवनव्या युक्त्या चोरांनी शोधून काढल्या असून, मागील तीन दिवसांत रांचीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन वेगवेगळ्या एटीएममधून चोरांनी 75 हजार रुपये लांबवले आहेत.
एटीएममधून पैसे काढताना इतर कोणी आसपास नसल्याची खात्री करून घ्यावी, एटीएममधून मिळालेली स्लिप तेथेच टाकू नये, ही स्लिप सोबत घेऊन जावी किंवा हवी नसल्यास तिथेच बारीक तुकडे करून फेकावी. पासवर्ड टाइप करीत असताना तो कुणी पाहत नसल्याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना पोलिस आणि बँक नेहमीच देत असूनही एटीएम, क्रेडिट व डेबिट कार्डधारकांना चोर विविध पद्धतींनी लुटतच आहेत.
चोरांनी ज्या तिघांना लुटले आहे त्यात झारखंड उच्च न्यायालयातील एका महिला वकिलाचाही समावेश आहे. पोलिसांनी या तिघांनाही सीसीटीव्ही फुटेज दाखवून पैसे काढणा-या व्यक्तींची ओळख पटवून घेतली आहे. हे लोक सापडले नाहीत तर त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एटीएम कार्डमागील चुंबकीय पट्टी चोरटे काढतात आणि दुस-या कार्डवर चिकटवून पैसे काढून घेतात
एटीएम कार्डमागे असलेली काळी पट्टी इलेक्ट्रॉनिक चीप असते. त्यावर लॅमिनेशन असते. कार्ड नीट हाताळले नाही, तर ही पट्टी एका बाजूने निघते.
त्याचाच फायदा घेऊन चोरटे ही चुंबकीय पट्टी काढून घेतात. ही पट्टी दुस-या कोणत्याही कार्डवर लावून वापरता येते. एटीएम मशीन या पट्टीवरील माहितीच वाचू शकते.

पासवर्ड टाइप करीत असताना आपल्यामागे उभी असणारी व्यक्ती पाहू शकते. त्यामुळे एकट्यानेच पैसे काढा.

एटीएममधून मिळणा-या स्लिपवर कार्ड नंबर असतो. पिन नंबरही समजल्यास चोर ऑनलाइन शॉपिंग करू शकतात.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये के्रडिट किंवा डेबिट कार्डचा नंबर आणि पिन नंबरची गरज असते. याद्वारे विमान तिकीटही मिळवता येते.

फसवणूक झाल्यास हे करा
> तत्काळ बँकेच्या इमर्जन्सी नंबरवर फोन करून कार्ड ब्लॉक करा. पोलिसांत तक्रार द्या.
> एसबीआयच्या 18004253800 या क्रमांकावर सूचित करून तिकीट क्रमांक अवश्य घ्या.
> बँकेच्या शाखेत लेखी अर्ज देऊन एटीएम कार्डद्वारे होणारी सर्व प्रकारची ऑनलाइन बँकिंग बंद करायला सांगा.
सावधगिरी बाळगा
> पासवर्ड इतर कुणालाही सांगू नका
> एटीएममधून मिळणारी स्लिप तेथेच टाकू नका, ती सोबत घेऊन जा किंवा तिचे बारीक तुकडे करा.
> एटीएम कार्डवर पासवर्ड लिहू नका
> कार्ड वापरण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका
> कार्ड दुस-याच्या हातात देऊ नका
> सिंगल मशीन एटीएममध्ये एकट्यानेच पैसे काढा
> एटीएम कक्षातून बाहेर पडताना कॅन्सलचे बटन दाबा
> मोबाइल क्रमांकाची बँकेत नोंदणी करा. त्यामुळे तुमच्या कार्डवरून कुणी पैसे काढल्यास तत्काळ एसएमएस मिळेल.
> वेळोवेळी पासवर्ड बदला
> खात्रीच्या दुकानांवरच क्रेडिट, डेबिट कार्डांद्वारे पेमेंट करा
>इंटरनेटवर कुठल्याही चुकीच्या वेबसाइटवर पासवर्ड टाकू नका