आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांमध्ये वाढतेय ऑडिओ बुकची क्रेझ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही जर टेक्नोसॅव्ही असाल तर आता तुम्हाला पुस्तकांची आवड चांगल्या प्रकारे जोपासण्याची संधी मिळणार आहे. कारण इंटरनेटवर ऑडिओ बुक्सचा ट्रेंड वाढू लागला आहे. भारतात इंटरनेटच्या माध्यमातून विविध ग्रंथांच्या श्रवणाचा आनंद लुटण्यासाठी युजर्सची संख्या वाढली आहे.

भारतात ऑडिओ बुक्सना मागणी असून देशातील बाजारपेठेत या क्षेत्रातील उलाढाल झपाट्याने वाढू लागली आहे. रिओडो ऑडिओ बुक्स या कंपनीने भारतात अशा प्रकारची ऑनलाइन सुविधा निर्माण करून दिली आहे. ऑडिओ बुक्सची उपलब्धता करून देणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे. ऑडिओ बुक युजर फ्रेंडली असतात, असे रमिता यांना वाटते. रिओडो ग्रीन बॉलवर्ड प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. ज्याप्रमाणे आपल्याला वृत्तपत्र वाचायला आवडते
आणि रेडिओ ऐकायलाही आवडतो, त्याप्रमाणेच ऑडिओ बुकचे आहे, असे मत मनोज शर्मा यांनी व्यक्त केले.

डिजिटल डाऊनलोड
ऑडिओ बुक्सचे डिजिटल डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तिमाहीत हे प्रमाण 52 टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले आहे.
पुस्तके परवडणारी
कंपनीच्या वतीने देण्यात येणारी पुस्तके किमान 100 रुपयांच्या पुढे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे ती सर्वांना परवाडणारी आहेत.
सुमीत सुनेजा, रिओडो ऑ डिओ बुक्सचे सीईओ.