आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदीगड - अर्जुनपुत्र अभिमन्यू महाभारतात ज्या चक्रव्यूहात फसला होता, त्याच चक्रव्यूहाच्या प्रतिकृतीद्वारे ऑटिझम अर्थात स्वमग्नतेने ग्रस्त असलेल्या मुलांवर उपचार करणे आता सोपे होणार आहे. या चक्रव्यूहाच्या मदतीने अशा मुलांच्या मानसिक प्रक्रियांचा वेग वाढवला जाणार असून अशा प्रकारचा चक्रव्यूह चंदीगड येथे तयार केला जात आहे.
हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या वतीने मन तसेच शरीरावर सखोल संशोधन करून त्यावर आधारलेले हे मॉडेल चंदीगडमधील सेक्टर - 36 येथे उभारले जात आहे. सोरम अर्थात सोसायटी फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली चॅलेंज्ड या संस्थेतर्फे हे मॉडेल उभारले जाणार आहे. सोसायटीच्या सचिव प्रोमिला चंद्रमोहन यांनी सांगितले की, मागील एका वर्षापासून त्या या संशोधनावर अभ्यास करत आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या व सध्या अमेरिकेत राहणा-या मुलीशी त्यांनी यासंबंधी चर्चा केली असता अमेरिकेत जवळपास सर्व शाळांमध्ये ही पद्धत वापरली जात असल्याचे समजले. ही एक थेरपी आहे. चंद्रमोहन सांगतात, या चक्रव्यूहातून मुले एकाग्र चित्त होऊन चालले तर त्यांची सतर्कता कमी होईल. ऑटिझमग्रस्त मुलांना या चक्रव्यूहावर चालण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून यावर आधारित होमवर्क दिला गेला आहे. सध्या कागदावर बनलेल्या चक्रव्यूहावर बोट ठेवून ध्येय गाठण्याची तयारी करत आहेत. सामान्य मुलांच्या तुलनेत अशा विशेष मुलांची ग्रहणक्षमता कमी असते. त्यामुळे चक्रव्यूहात दिशादर्शक बाण लावले जाणार आहेत.
असा आहे चक्रव्यूह
चक्रव्यूहातील रस्त्यांवर माती, दगड, वेगवेगळ्या आकाराचे पांढरे खडे टाकले जाणार आहेत. याद्वारे मसाज आणि अॅक्युप्रेशर थेरपी साधली जाईल. वेगवेगळ्या पृष्ठभागावर चालल्यामुळे स्नायू सक्रिय होऊन मेंदूला चालना मिळते. गोलाकार फिरणे आणि सतत बदलणा-या डाव्या-उजव्या रस्त्यांमुळे मेंदूमध्ये एक संतुलन साधले जाते. बुद्धी वेगाने काम करते. तणाव, निद्रानाश आणि ब्लड प्रेशरच्या आजारांसाठीही ही थेरपी उपयोगी ठरते. श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया संतुलित करण्यासाठी तसेच तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही वेदनामुक्तीसाठी ही उपचार पद्धती लाभदायक ठरते.
ऑटिजम ग्रस्त मुलांची आकलन क्षमता आणि निर्णयक्षमतेत सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारचे मॉडेल उपयोगी पडते. या मॉडेलच्या साहाय्याने त्यांची समज, तसेच बोलण्यातही सुधार होऊ शकतो.
डॉ. वसुधा कामरा, बालरोग तज्ज्ञ, चंदिगड
सेंसरी इंटिग्रेशन थेरपी ही ऑटिझमच्या उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडते. चक्रव्यूहाच्या मॉडेलद्वारे अशा मुलांवर अधिक चांगले उपचार करता येऊ शकतील.
डॉ. शैलेश मेहता, बालरोगतज्ज्ञ लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, मुंबई
चक्रव्यूहाची थेरपी
महाभारतकालीन योद्धे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी चक्रव्यूहाचा एखाद्या माध्यमाप्रमाणे वापर करत असत. चक्रव्यूहाचे हेच वैशिष्ट्य लक्षात घेता सध्या मानसिक एकाग्रता व शारीरिक संतुलन राखण्याचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. शरीराच्या अंतर्गत संरचनेचा विचार केल्यास कानाच्या आतील रचना चक्रव्यूहासारखी असते. व्हेस्टिव्यूलर सिस्टिमचा तो एक भाग आहे. या यंत्रणेत एकात एक
गुंफलेले तीन वर्तुळाकार मार्ग असतात. याद्वारे आपले डोके तसेच संपूर्ण शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेत स्थिर राखण्यात मदत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.