आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामुळे 20 जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. गुरेज सेक्टरमधील डावर येथील आर्मी कँप हिमस्खलनामुळे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. डावर येथे 14 जवानांचा मृत्यू झाला असून सोनमर्गमध्येही सहा जवानांचा मृत्यू झाला आहे.
डावर कँपमध्ये सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे लष्काराचे अनेक कँप उद्धवस्त झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. परंतु, सातत्याने सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे मदतकार्यात अडथळा येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.