आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बाबरी पतनाची घटना राष्ट्रीय गुन्हा ठरवणा-या केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच झापले. बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ते राष्ट्रीय गुन्हा आहे की नाही हे न्यायालय ठरवेल. सर्वोच्च अथवा कनिष्ठ न्यायालयाने याबद्दल निर्णय दिल्यास तुम्ही अशा शब्दांचा वापर करू शकता, असे न्या. एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीबीआयला सांगितले. अॅड. पी. पी. राव यांनी सीबीआयच्या वतीने दाखल केलेल्या अहवालात भाजप व विहिंपच्या नेत्यांचा राष्ट्रव्यापी कटकारस्थानात सहभाग असल्याचे नमूद केले. रथयात्रेतून ते दिसून आले आणि हा राष्ट्रीय गुन्हा असल्याचा शेरा सीबीआय वकिलाने मारला होता. यावरून न्यायालयाने कानउघाडणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.