आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babri Masjid Demolition Case: SC Pulls Up CBI For Delay In Challenging HC Order

बाबरी मशीद विध्‍वंस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला फटकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बाबरी मशीद विध्‍वंस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरूवारी सीबीआयला फटकारले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी आणि अन्‍य नेत्‍यांच्‍या विरोधातील कटाचा आरोप अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळला होता. या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्‍यास सीबीआयने दिरंगाई केली होती.

अनेकवेळा या प्रकरणाची सुनावणी टाळल्‍यामुळे कोर्टाने सीबीआयवर ताशेरेही ओढले. हा देशाच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचा असलेला विषय सीबीआय खूप लांबवत असल्‍याचे कोर्टाने म्‍हटले. उल्‍लेखनीय म्‍हणजे, सीबीआयने आजही (गुरूवारी) या प्रकरणाची सुनावणी टाळण्‍याची मागणी केली होती.

सीबीआयने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत अडवाणी, मुरली मनोहर जोशी समवेत इतर अन्‍य नेत्‍यांविरोधात बाबरी मशीद पाडण्‍याचा कट रचल्‍याबद्दल कलम 120 ब जोडण्‍यासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करण्‍यासाठी 13 फेब्रुवारी तारीख दिली आहे.