आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी मशीद पाडणे ही केवळ एक घटना, प्रसिद्ध-कुप्रसिद्ध प्रकार नाहीः

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाबरी मशीद पाडण्याचा प्रकार ही केवळ एक घटना असून त्यात प्रसिद्धी, कुप्रसिद्धी असा कुठलाही प्रकार नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भाजप नेते लालकृष्ण आडवानी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह 18 जणांविरुद्ध याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
सुनावणी सुरु होताच, हे प्रकरण गाजलेल्‍या 'बाबरी मशीद' पाडण्याचा घटनेशी संबंधित आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटरने केला. त्यावर न्या. एच. एल दत्तू आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने तात्‍काळ निरिक्षण नोंदविताना ही केवळ घटना असल्याचे मत व्यक्त केले. यात प्रसिद्धीसारखे काय आहे. ही केवळ घटना आहे. ही घटना आणि पक्ष दोन्हीही आपल्या समोर आहे. त्यात प्रसिद्धी, कुप्रसिद्धी असे काही नाही, असे न्यायालयाने सांगितले.
याप्रकरणाशी संबंधित इतर प्रतिवादींनी अद्याप त्‍यांचे उत्तर दिलेले नाही. त्‍यामुळे सुनावणी 27 मार्चपर्यंत लांबविण्‍यात आली. सर्वोच्‍च न्‍यायालयाने गेल्‍यावर्षी 4 मार्च रोजी लालकृष्‍ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, कल्‍याण सिंह, उमा भारती, आोक सिंघल, विनय कटीयार, मुरली मनोहर जोशी, साध्‍वी रुतुंभरा, इत्‍यादींना नोटीस पाठविली होती. तुमच्‍याविरुद्ध याप्रकरणी गुन्‍हेगारी खटला का चालविण्‍यात येऊ नये, अशी नोटीस न्‍यायालयाने दिली होती.
बाबरी पतनची दुवापठण परंपरा खंडित
बाळासाहेब ठाकरेंची सून बाबरी प्रकरणावर चित्रपट बनविणार