आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babri Masjid Dimolish Balasheb Thakr Save Accused

बाबरी पतन केवळ एक घटना; ठाकरे, सावेंसह 21 जणांवर कटाचे कलम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे ही केवळ एक घटना आहे. त्यात ‘फेमस’ किंवा बदनामीसारखी काही गोष्ट नाही. सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत नोंदवले. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आणि औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्यासह 21 जणांवर गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्याबाबत आता 27 मार्च रोजी निर्णय होईल.
न्यायमूर्ती एच.एल. दत्तू आणि सी.के. प्रसाद यांच्या पीठाने म्हटले आहे की, यात फेमस काय आहे. ही एक घटना होती जी घडली. तत्पूर्वी, हे प्रकरण ‘फेमस’ बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याशी संबंधित आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते.
हे आहेत आरोपी : लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, कल्याण सिंग, उमा भारती, सतीश प्रधान, सी.आर. बन्सल, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, साध्वी ऋतंभरा, विष्णू हरि डालमिया, महंत अवैद्यनाथ, आर.व्ही. वेदांती, परमहंस रामचंद्र दास, जगदीश मुनी महाराज, बी.एल. शर्मा, नृत्यगोपाल दास, धर्मदास, सतीश नागर आणि मोरेश्वर सावे.