आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांच्याविरुद्ध शनिवारी दिल्ली न्यायालयाने एका खटल्यासंबंधी न्यायालयात हजर न झाल्याने दखलपात्र वॉरंट काढले आहे. डॉ. रामदास यांच्यावर आवश्यक सोईसुविधा नसताना पैसे घेऊन एका वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश तलवंत सिंह यांनी रामदास यांच्याविरुद्ध दहा हजार रुपयांचे वॉरंट जारी केले. केंद्रामध्ये यूपीएचे सरकार आल्यानंतर मे २००४ ते एप्रिल २००९ या काळात रामदास आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री होते. सीबीआयने या प्रकरणी रामदास यांच्यासह इतर अधिका-यांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.