आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुटखाबंदीचा देशभर परिणाम, मध्य प्रदेशाने दाखवली वाट; महाराष्‍ट्रातही तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुटखा तसेच पानमसाला विक्रीवर मध्य प्रदेशात सरकारने घातलेल्या बंदीचा देशभर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशासह केरळ व बिहार राज्यांनी लावलेल्या या बंदीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इतर राज्यांना पत्रे लिहून या निर्णयाचे अनुकरण करत गुटखा विक्रीवर बंदी घालावी असे म्हटले आहे. यानुसार राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर व ओडिशा सरकारही गुटखा विक्रीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने गेल्या वर्षी जारी केलेली अधिसूचना व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अन्नपदार्थांमध्ये निकोटीनचा वापर हानिकारक आहे. पानमसाला व गुटखाबंदीसंदर्भात मध्य प्रदेश राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेच्या आधारे राजस्थान, जम्मू-काश्मीर व ओडिशा या तीन राज्यांनी निकोटीनयुक्त गुटखा व पानमसाल्याचे उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, जम्मू-काश्मीर व ओडिशा राज्यांनी निकोटीनयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भात तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र शासनही गुटख्यावर बंदी घालण्याच्या विचारात असून त्यादृष्टीने सरकारची तयारी सुरू असल्याचे अन्न व औषध नियंत्रणमंत्री सतेज पाटील यांनी नुकतेच सांगितले. गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातल्यानंतर या निर्णयाला कोणत्याही याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान देता येऊ नये याची दक्षता घेऊन शासन हा बंदीचा निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तंबाखूजन्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणा-या सुमारे 3095 घटकांपैकी 28 घटक कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. देशात आढळणा-या तोंडाच्या कर्करोगांच्या एकूण रुग्णांपैकी 90 % रुग्ण तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. तंबाखूजन्य आजारांवरील उपचारासाठी देशात दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपये खर्च होत असल्याची माहितीही समोर येत आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक अमल पुष्प यांनी सांगितले की, राज्ये बंदीस उशीर करू शकतात. मात्र तंबाखूबंदी टाळू शकत नाहीत. बंदीतून पळवाटा राहू नये यासाठी सरकार व एफडीए काम करीत आहे.

बिहारमध्ये बंदी महत्त्वाची का ?
बिहारमध्ये गुटखा, पानमसाल्यावर बंदी घालणारे अन्न सुरक्षा आयुक्त संजयकुमार यांच्यानुसार बिहारमधील तरुण वर्ग तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जातो आहे. फक्त महाविद्यालयीन तरुणच नव्हे, तर शालेय विद्यार्थीही तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात गुरफटले आहेत. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे (गॅट्स) च्या अहवालानुसार बिहारमध्ये 53.5% प्रौढ लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. या मध्ये महिलांचे प्रमाण 34.6 % एवढे आहे. या महिला पुरुषांच्या बरोबरीने खैनी, गुटखा व पानमसाल्याचे सेवन करत असल्याचे आढळले आहे.
तंबाखू, गुटखा विकल्यास गुरुजीच ठोठावणार दंड !
गाढव तंबाखू खात नाही