आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुत्र्यांच्या झुंजीचे फोटो फेसबुकवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- मैत्री वाढवणा-या फेसबुक या सोशल वेबसाइटवर एका अज्ञात व्यक्तीने तगडे शत्रू बनवले आहेत. त्याने कुत्र्यांच्या झुंजीचे फोटो स्वत:च्या खात्यावर टाकले असून वन्यजीवप्रेमींनी त्याचे प्रोफाइल हेरले आहे. कुत्र्यांच्या झुंजीवर बंदी आहे. त्यामुळे अशी झुंज कुणी लावली आणि हे फोटो या तरुणाकडे कसे आले यासाठी या तरुणाचा शोध घेतला जात आहे. तसेच त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फेडरेशन आॅफ इंडियन अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनने (फियापो) या तरुणाची माहिती देणा-याला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून mail@fiapo.org या मेलवर माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. तरुणाच्या प्रोफाइलवर कुत्र्यांची रक्तरंजित झुंज दाखवणारे 20 पेक्षा जास्त फोटो टाकण्यात आले आहेत. अशी झुंज कुठे लावण्यात येत आहे, याची चिंता फियापोच्या प्रतिनिधींना आहे. फियापोच्या प्रतिनिधींनी फोटोंचा बारकाईने अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळून आले की, हा युवक झुंजी पाहणारा प्रेक्षक नसून स्वत: त्यात सहभागी होता. तो पंजाबमधील मालवा भागातील रहिवासी असल्याचे कळले आहे. सध्या तो कोटकपुरा भागात असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. फियापोच्या कँपेन कोऑर्डिनेटर आलोकपर्णा सेनगुप्ता यांच्या मते, पंजाब आणि हरियाणात कुत्र्यांच्या झुंजी लावल्या जात आहेत.

सापांचेही फोटो
पंजाब कृषी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला फेसबुकवर सापांचे फोटो टाकणे महागात पडले होते. विद्यापीठातील साप पकडतानाचे फोटो पाहून वन्यप्राणी विभागाने त्याचा शोध घेतला आणि एवढे साप त्याच्याकडे कसे आले आणि ते कोठे सोडून दिले, या प्रश्नांची लेखी उत्तरे मागितली होती.