आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोटा वाढला; रेल्वे दरवाढीचा पुन्हा एकदा घाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांनी प्रवास भाड्यात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 21 जानेवारीलाच रेल्वेने प्रवास भाड्यात दरवाढ केली आहे.

चंदीगडमध्ये शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान बंसल म्हणाले की, तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करणे ही आमची अपरिहार्यता आहे. गेल्या महिन्यातील दरवाढीमुळे रेल्वेला वर्षभरात 6600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र यातील 3300 कोटी रुपये फक्त इंधनावरच खर्च होतील. उरलेल्या पैशांतून रेल्वेला आपले जुनेच प्रकल्प पूर्ण करता येतील. 21 जानेवारीला प्रवास भाड्यात 2 ते 30 पैसे प्रतिकिलोमीटरपर्यंत दरवाढ करण्यात आली होती.

मेट्रो प्रवासही महागणार - दिल्लीतील मेट्रो रेल्वेचाही प्रवास महागण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पाेरेशनचे प्रमुख मंगू सिंह यांनी सांगितले की, मेट्रोच्या परिचालनाचा खर्च सातत्याने वाढत आहे. मेट्रोच्या मागणीवर सरकारने दरनिश्चिती समितीची स्थापना केली असून येत्या चार-पाच महिन्यांत ती अहवाल सादर करेल.