आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पसंख्यांक मंत्रालयाचा अजब सल्ला; गोमांस खा अन् लोह वाढवा, भाजप संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने प्रकाशित केलेली 'पोषण' ही पुस्तिका वादात सापडली आहे. शरीरात लोह (आयर्न) कमी असेल तर गायींचे मांस खावे, असा सल्ला या पुस्तिकेतून देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने या पुस्तिकेवर आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकार मतांच्या राजकारणासाठी आयर्नच्या कमतरतेचे कारण पुढे करुन गोमांस खाण्याचा प्रचार करीत आहे. पक्ष संसदेतही हा मुद्दा उपस्थित करणार असून, सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे भाजपचे उत्तरप्रदेश अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार गोमांस भक्षणाचा प्रचार करत असल्याचा आरोप, डॉ. वाजपेयींनी केला आहे. ते म्हणाले, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाद्वारा संचलित राष्ट्रीय जनसहयोग आणि बाल विकास संस्था यांनी प्रकाशित केलेल्या 'पोषण' या पुस्तिकेत शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी गायीचे मांस खाणे योग्य असल्याचे म्हटले आहे.