आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळी मारण्यापूर्वी डीएसपीला मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगडचे पोलिस उपाधीक्षक झिया-उल-हक यांना गोळी घालण्यापूर्वी बेदम मारहाण करण्यात आली होती. उत्तरीय तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. झिया यांच्या शरीरावर 12 जखमा होत्या. पाय आणि छातीच्या डाव्या बाजूला गोळीचे व्रण स्पष्ट दिसतात. शरीरावर आणखी एक गोळीसारखाच व्रण आहे.
झिया यांच्या पाठीत झाडलेली गोळी छातीतून आरपार निघाली होती. यामुळेच त्यांच्यावर मृत्यू ओढावल्याचे सांगण्यात येते. झिया यांची पत्नी परवीन यांनी उत्तरीय अहवाल मान्य असल्याचे म्हटले आहे. पतीच्या शरीराच्या प्रत्येक जखमेला हात लावला आहे. त्यांना तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या. अतिरिक्त पोलिस महासंचालकाने ताज्या मुलाखतीत उत्तरीय अहवाल नाकारला आहे.