आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेक्सी’ म्हणजे सुंदर, मोहक; ममता शर्मांच्या वक्तव्याने वादंग

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांच्या वक्तव्याने नवेच वादंग निर्माण केले आहे. मुले मुलींकडे पाहून ‘सेक्सी’ अशी कॉमेंट पास करतात; परंतु हा शब्द नकारार्थी घेतला जाऊ नये. सुंदर आणि मोहक असाच त्याचा अर्थ घ्यावा, असे उद्गार ममता यांनी काढले. महिला संघटनेच्या कार्यक्रमात ममता बोलत होत्या. कार्यक्रम संपताच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष सुमन शर्मा यांनी महिलांच्या भावनांविषयी काँग्रेसला आदर असेल तर ममता यांना राष्ट्रीय पातळीवरील पदावरून तत्काळ हटवले पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नये, असे ममता शर्मा यांनी म्हटले आहे. कार्यक्रम घेतला त्या संघटनेनेही ममता यांचे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.