आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्सची कमाई घटली; ‘बिग बी’च्या कमाईत 70 टक्के घसरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: बॉलीवूड मेगास्टार, सुपरस्टार्सच्या गलेलठ्ठ कमाईमध्ये घट झाल्यामुळे यंदा अमिताभ बच्चन ते अक्षयकुमारपर्यंत सर्वच स्टार मंडळींच्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सची रक्कम घसरली आहे. या सर्वांच्या जाहिरातींचे कमी झालेले प्रमाण आणि बॉक्स आॅफिसवर त्यांच्या चित्रपटांच्या कलेक्शनचे आकडे समाधानकराक नाहीत हे त्याचे प्रमुख कारण आहे.
सन 2011-12 या आर्थिक वर्षात एप्रिल-मेनंतर बहुंतांश स्टार्सना नव्या जाहिराती मिळाल्या नाहीत. जगभरात आलेल्या आर्थिक मंदीचे परिणाम भारतातही दिसत असल्यामुळे एफ एमसीजी कंपन्यांनी जाहिरातींचे बजेट कमी केले आहे. टीव्हीवर सर्वाधिक जाहिराती शाहरुख खानच्या असतात. आयकर खात्याच्या आकडेवारीनुसार सन 2010 च्या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल ते डिसेंबर 2010) शाहरुखने 20 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स टॅक्स अदा केला होता, तर याच कालावधीची तुलना केल्यास यंदा सन 2011 मध्ये त्याने 10 कोटी रुपयांचा टॅक्स अदा केला आहे.
याचा अर्थ शाहरुखची कमाई 50 टक्के घटली आहे. अर्थात ‘रा.वन’, ‘डॉन-2’ सारख्या पडेल चित्रपटांचाही त्याला फटका बसला असणार.
अक्षयने 11 कोटी रुपये भरले
अक्षयकुमारने अलीकडेच 11 कोटी रुपये आयकर खात्याकडे जमा केले. गतवर्षी याच कालावधीसाठी त्याने 20 कोटी रुपये टॅक्स भरला होता. यावरून शाहरुख व अक्षयची कमाई 50 टक्के घटली असली तरीही ती 100 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असणार हे निश्चित.
सलमान खान शाहरुखपेक्षा सरस
शाहरुखशी प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करू पाहणारा सलमान येथे सरस ठरला आहे. ‘बॉडीगार्ड’च्या दणक्यात कमाईचा हा परिणाम असेल. त्याच्या कमाईत यंदा फारशी घट झालेली नाही. सलमानने गतवर्षी डिसेंबरमध्ये 11 कोटी रुपये टॅक्स भरला होता. यंदा त्याने 9 कोटी रुपये भरले आहेत.
‘बिग बी’च्या कमाईत 70% घसरण
महानायक अमिताभ बच्चनच्या कमाईत सुमारे 70 टक्के घसरण झाली असल्याचे आकडे सांगतात.सन 2010 मध्ये त्याने एप्रिल-डिसेंबर कालावधी साठी 13 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला होता. यंदा फक्त 4 कोटी रुपये त्याने अदा केले आहेत.
रणबीरचा पाच कोटी टॅक्स
सुपरस्टार पदाकडे निघालेल्या रणबीर कपूरच्या तरुण, फ्रेश चेह-याला हळूहळू जाहिरातींसाठी पसंती मिळत आहे, परंतु तो आपल्या सिनियर्सपेक्षा बराच पिछाडीवर आहे.2010-11 च्या पहिल्या तिमाहीसाठी त्याने 7.6 कोटी रुपये टॅक्स भरला होता. यंदा ही रक्कम 5.2 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. आमिर खानने सन 2010-11 वर्षात एकूण आयकर 11 कोटी रुपये भरला होता.
करिना, प्रियंकाचे टॅक्स कमी
करिना कपूर, प्रियंका चोप्रासारख्या आघाडीच्या नायिकांच्या टॅक्सचे आकडेही कमी आहेत. प्रियंकाने गतवर्षी पहिल्या तिमाहीसाठी 5.2 कोटी टॅक्स भरला होता. यंदा तो 2 कोटी रुपयांवर आला. करिनाचा टॅक्स 5 कोटी रुपयांवरून थेट 2.5 कोटी रुपये म्हणजे 50 टक्के घटला असल्याचे दिसून आले.