आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमृतसर- भारत-पाकिस्तानच्या अटारी (वाघा) सरहद्दीवर सीमा सुरक्षा दलाचा रिट्रीट सेरेमनी पाहू इच्छिणा-यांसाठी एक खुशखबर आहे. हा समारोह प्रत्येकाला पाहता यावा यासाठी मोठे पडदे लावण्यास मंजुरी मिळाली असून बीएसएफ व पर्यटन विभागाच्या पुढाकाराने केला जाणारा हा जगभरातील वेगळा प्रयोग ठरणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात याची अंमलबजावणी होईल.
हाऊसफुलचा बोर्ड लागणार नाही
कन्टीनच्या बाजूला बीएसएफने लोखंडी चॅनलवर बसण्याची व्यवस्था केली आहे. येथे किमान 1 हजार लोक रिट्रीटचे थेट प्रसारण पाहू शकतील. दुस-या बाजूला पोल व चॅनल लावण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. या बाजूने असंख्य लोकांना हे प्रसारण पाहता येईल.
रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी दररोज 20 ते 25 हजार लोक येतात. सण-उत्सव किंवा उन्हाळ्याच्या सुट्यात ही संख्या दुपटीने वाढते. प्रेक्षक गॅलरीत फक्त 5 हजार लोक बसू शकत असल्याने दररोज अनेकांना निराश होऊन परतावे लागते. अनेकदा येथे हाऊसफुलचा बोर्डही लावावा लागतो. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सर्वांनाच समारंभ पाहता येईल. जिल्हा पर्यटन अधिकारी बलराजसिंह म्हणाले की, येथून कुणीही निराश होऊन जाऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात येत आहे.
प्रकल्प काय आहे ?
वाघा बॉर्डरच्या ज्वाइंट चेक पोस्टवर (जेसीपी) असलेल्या प्रेक्षकांच्या गॅलरीमागे (सुवर्णजयंती द्वाराच्या दोन्ही बाजूंना) हे मोठे पडदे लावले जातील. एलसीडीसारखी दिसणारी ही सिस्टिम कॅन्टीनच्या बाजूला समोर प्रेक्षक गॅलरीच्या भिंतीवर लावले जातील. दुसरा पडदा रस्त्याच्या दुस-या बाजूला होर्डिंगसारखा लावला जाईल. हे पडदे अत्याधुनिक सीसीटीव्हीला जोडलेले असतील आणि सुवर्णजयंती द्वाराबाहेर बसलेल्या लोकांनाही रिट्रीट समारंभ पाहता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.